चित्त लागो सदा ध्यानी I

चित्त लागो सदा ध्यानी । पाय पाहो नेत्र दोन्ही ॥
ऐसे लक्षी वेड लागो । वृत्ति अखंडित जागो ॥
मन राहो सावधान I तुझे कराया स्मरण ॥
तुकड्या म्हणे श्रेष्ठ लाभ । मार्ग पावला सुलभ ॥