अम्हि दास तया श्रीहरिचे राहणार बहूुता दुरिचे

(चाल: कशी मोहनि घातली ...)
अम्हि दास तया श्रीहरिचे राहणार बहूुता दुरिचे ॥धृ0॥
आईबाप ब्रह्मभुवनासी खेळवी जगी आम्हासी ।
परि सुत्र    तयांच्या   करिचे । राहणार0 ॥१॥
आम्हा देह - भाव मुळि नाही दिसतो हा भासचि पाही ।
तो नटवि अम्हा   परोपरिचे । राहणार0 ॥२॥
नच पुरुष - लक्ष्मिही काही नच भिन्न भास हा राही ।
निपजलो मुळीच्या    घरिचे । राहणार0 ॥३॥
प्रभुची त्या अघटित माया दाखवितो जनलोका या ।
तुकड्या म्हणे भेद हे वरिचे । राहणार0 ॥४॥