असा कसा देव हा भोळा खेळवी वनी गोपाळा

(चालः कशी मोहनि घातली...)
असा कसा देव हा भोळा खेळवी वनी गोपाळा ॥धृ0॥ 
ठेवुनी बंसरी हाती घेतसे गोपि सांगाती ।
करि दूध - तुपासी     गोळा । खेळवी0 ॥१॥
चित्त चोरुनि ने भक्ताचे मन मोहितसे योग्याचे |
दिसे दुरुन   पाहता   खूळा । खेळवी0 ॥२॥
शिरि मोर - पिसारा भारी कटि पीतांबर जरतारी ।
ना भीत सखा कळिकाळा । खेळवी0 ॥३॥
तुकड्याचि आस पुरवावी मनि एकचि इच्छा द्यावी ।
जिव अर्पू पदी त्या सगळा । खेळवी0 ॥४॥