वासनेचा दृष्ट जन्मलो मी देवा
वासनेचा दुष्ट जन्मलो मी देवा ! । कथी तुझ्या नावा घेईन मी ? ॥
निंदास्तृती मज फार वाटे गोड । जन्माचा मी द्वाड झालो टेवा ! ॥
अंती माझी स्थिती होईल ती केसी ? । देईल का फासी यम मज ? ॥
म्हणे तुकड्यादास सावध मी नाही । येई लवलाही उद्धराया ॥