किती वळवून मना ? न राहेची स्थिर

किती वळवू मना ? न राहेचि स्थिर । श्रीहरी ! सत्वर धाव आता ।।
बोध नसे मज, निर्दय मी झालो । पंथासी लागलो नर्काचिया ॥
निंदास्तुती मज वाटे फार गोड । करी याचा मोड श्रीहरी गा ! ।।
तजविण आता न राहे है मन । देई वरदान तुकड्या म्हणे ॥