ऐसे वाटे मना, घडो प्रभू चींतन

ऐसे वाटे मना, घडो प्रभु - चिंतन ।
राही मुखी नाम, मन ध्यानी तल्लीन ll
कुणाचाही छळ मनी वाणीही नये ।
आपुलेसे व्हावे सकळ जन पराये ।।
गुण दुस-याचे सदा पडावे कानी ।
अवगुण आपुले दिसोत या डोळ्यांनी l
तुकड्यादास म्हणे जीव होवो समरस ।
ऐसा निजध्यास लाभो अंगी तो रस ॥