रामायना ! पाही दासाची फजिती
रामराया ! पाही दासाची फजिती । हाईल की स्थिती अंती काय ? ॥
स्मरण ते तुझे नाही माझे मुखी । केवि राहे सुखी जगामाजी ॥
पाहसी का अंत फार रामराया ?। स्वरूप दावाया येई आता ॥
तुकड्यादास म्हणे होईल आनंद । घेता चरणास्वाद रामराया ! ॥