अशुद्ध ती वाच्या प्रेम नाही जरी

अशुद्ध ती वाचा प्रेम नाही जरी । तुज का श्रीहरी ! आवडे ते ? ॥
तुझे नाव जरी घेईन प्रेमाने । तरी कृपादाने पावसी तू ॥
सांगती ते भक्त ऐसा तू उदार । का न मजवर कृपा करीसी ?॥
म्हणे तुकड्यादास धन्य मी होईन । आनंदे नाचेन कीर्तनी गा ! ॥