रुपी जडो माझे चित्त

रूपी      जडो    माझे   चित्त । हेचि मागणे त्वरीत ।।
आणिक नलगे धनसंपत्ती । चरण राहो माझे चित्ती ॥
बह     झालो     कासावीस । नको त्रिविधाचा त्रास ॥
तुकड्या म्हणे मागू काय ? । तूचि गणगोत बापमाय ॥