सदा दिसो तुझी मूर्ति

सदा दिसो तुझी मूर्ती । हेचि देई मज स्फुर्ती ॥
नाम गोड रूप गोड । तुझिया स्मरणे पुरती कोड ॥
ऐसा दीनांचा दयाळ । नाम घेता पळतो काळ ॥
म्हणे तुकड्यादास हरी ! । माझे विघ्न हे निवारी ॥