कर्मठा ! कर्म हे सोडी, ईश्वर जोडी आसरा ।
कर्मठा ! कर्म हे सोडी, ईश्वर जोडी आसरा ।|धृ० |)
का धरुनि धरुनि अभिमाना,म्हणसी मी जगति शहाणा ?
रे ! जाईल वय हे जाणा, हर अज्ञाना पामरा ! ।।१ ||
नच लीन कुणासी झाला,नच शरण प्रभू-पदी गेला ।
तो व्यर्थ जगी या मेला, गायी चुकली वासरा।।२॥)
पढतची खोविली वेळा, करुनिया पुस्तके गोळा ।
अंतरला जगदुत्पाळा, यम तो बांधी कासरा ।।३॥|
ही सोड बला कामाची, धर माळ प्रभू-नामाची ।
तुकड्या गुरू-स्मरणी नाची, फोडी हृदया पाझरा ।।४॥।