अज्ञानी पामर काय जाणे देवा !

                          गुरुप्राप्तीची याचना
अज्ञानी पामर काय जाणे देवा ! । तुझी चरण-सेवा देई मज ॥
ऋषीमुनी ब्रह्म यासी नाही थाक । अज्ञानाची हाक काय घेती ? ॥
चोदा विद्या, शास्त्रे, अठराही पुराणे । परी गुरुविणे वर्म नाही ॥
म्हणे तुकड्यादास वसिष्ठासारिखे । गुरु व्यक्त राखे रघुनाथ ॥