तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वाटे मना ऐसे नम्रता धरावी
वाटे मना ऐसे नम्रता धरावी । परंतु करावी क्रृपा देवे ॥
तुच्छ मी पामर,नसे ऐसी शक्ती । करावया भक्ती तुझी देवा ! ॥
माझे मज आज कळो येत ऐसे । सद्गुरुसी खासे शरण जावे ॥
लालचीच्या गुणे गोडी लागो याची । तुकड्या तो नाची हरिभजनी ॥