काय पाप माझे झाले फार देवा !
काय पाप माझे झाले फार देवा ! । म्हणोनी केशवा ! अंतरसी ? ।
लोभाचिया गुणे मी का वाया गेलो । नामासी भुललो तुझिया गा ! ॥
ऐसी कृपा करी मजवरी आता । श्री सद्गुरुनाथा न विसरे मी ॥
वर देई ऐसा गोडी लागो त्याची । धूळ हो पायाची तुकड्या म्हणे ॥