आणिकाची चाड नाही मज आता

आणिकाची चाड नाही मज आता । एका जगन्नाथा वाचोनिया ॥
जैसा तो ठेवीन तैसाचि राहीन । शरण जाईन त्याचे पायी ॥
नसे हो! विश्वास दुजियात माझा । एका गुरुराजा वाचोनिया ॥
तुकड्यादास म्हणे देव तो संपुष्टी । भरला असे दृष्टी सर्वाठायी ॥