शेवटचे हे नमन

शेवटचे   हे   नमन । संतापायी लोटांगन ॥
दृढभावे चरण धरी । कुठे जासी रे श्रीहरी ! ॥
बांधलासे भक्तीभावे । संत वाक्य आहे ठावे ॥
जिथे गुरुकृपा झाली । पूर्ण कामना निमाली ॥
तुकड्यादास म्हणे हरी ! कृपा आता खचित करी ॥