कुठवरी भोगशिल मौजा ? मग येति यमाच्या फौजा रे


कुठवरी भोगशिल मौजा ? मग येति यमाच्या फौजा रे ! ।|धृ०।।
धन-दारा-सुत-साथी सगळे, राखतील दरवाजा ।
अंतकाळि देतील लोटुनी, काढूनी घेती बाजारे ! ।।२॥।
हालिमहाली पोरे सगळे, आजचि म्हणती राजा |
शेवट कोणी साथ करी ना, का भुलसी या साजा रे ! ।।२॥|
चालतिचे हे गोत, पाहुणे, आले अपुल्या काजा ।
काज सोडुनी व्यर्थ भटकसी, काळ वाजवी बाजा रे ! ।।३॥।
चोऱ्यांशीचा फेरा पडतो, कोण भोगि तव आजा ?
तुकड्यादास म्हणे भय मोठे, भज-भज सद्गुरु-राजा रे ! ।।४॥।