जरी मंगळ वाणी

जरी अमंगळ  वाणी । सांभाळावी हो संतांनी ॥
बाळ नका टाकू दुरी । प्यावा चरणी हा भिकारी ॥
माझे पांगुळले   मन । तुम्हा संतांसी सोडून ।।
तुकड्या म्हणे पदरी धरा । संत दयाळ सोयरा ।।