सांगा माझा हो ! निरोप

सांगा माझा   हो ! निरोप । तुम्ही संत मायबाप ।।
वश      होईल    गुरुराव । ऐसा दाखवा उपाव ।।
बह जन्माचा   मी   दीन । होतो पायाची वहाण ।।
तुकड्या म्हणे मायबापा ! दावा मार्ग आता सोपा ॥