अंध मी पामर नेणवे मजसी
हार्दिक प्रार्थना
अंध मी पामर नेणवे मजसी । आलो तुजपासी उद्धरी गा ॥
जाणुनी सद्गुरु! अगाध तू धन्य । म्हणोनि अनन्य शरण आलो ।।
उद्धरी उद्धरी मजलागी त्राता ! । ठेविलासे माथा चरणावरी ॥
म्हणे तुकड्यादास पाहसी कां अंत ? । मांडिला प्राणांत गुरुराया ! ॥