काय बोलू फार ? अज्ञानी मी घोर

काय बोलू फार ? अज्ञानी मी घोर । संतांचा किंकर चरणी लोळे ॥
ब्रह्मज्ञान काही नेणवे मजसी । श्रीगुरु - चरणासी लीन झालो ॥
सदगुरु देैवत थोर वाटे मज । विश्वास सहज जडला माझा ॥
म्हणे तुकड्यादास रूप ते सुंदर । पाहोनिया थोर तरे पापी ॥