जरा न येवो चिंतनी ।

जरा न येवो चिंतनी । बहिर्मुखता माझ्या मनी  ॥
सदा रंगो रंगी जीव  ।   ध्यानी पाहता केशव   ॥
नको जनाचा हा त्रास । देवा! वाटते जीवास   ॥
तुकड्या म्हणे हर्ष मनी । वाढो प्रेमे क्षणोक्षणी ॥