तुजसी न पडो अंतर I

तुजसी न पडो अंतर । होता जगाचा व्यवहार  ॥
ऐसे असता काम करू। न तरी काननी या फिरू ॥
सर्व देहाचा व्यवहार ।  होवो तुझ्या  रूपावर ॥
तुकड्या म्हणे नारायणा! । पुरवी दासाची कामना ॥