कुणा दुःख द्याया मन ।

कुणा दुःख द्याया मन । कधी न येवो धावून ॥
 क्रोधे पीडा ने दे कोणा । राहो प्रभूच्या चरणा ॥
लोभ  न वाढो वाईट । धरो पंढरीचे पीठ ॥
तुकड्या म्हणे ऐसी आस । सदा लागली चित्तास ॥