जीव रंगो जीवापाशी I

जीव रंगो जीवापाशी । जीवलगाच्या पायाशी ॥
मन संकल्पो शृंगार । माझ्या पांडुरंगावर ॥
वृत्ति ध्यान करो सदा । स्थिरवाया तुज गोविंदा! ॥
देह राबो पंढरीत । तुकड्या म्हणे हाचि हेत ॥