आम्ही आंधळेचि जन I

आम्ही आंधळेचि जन । जरी न करो तुझे ध्यान ॥
हात पाय नाही आम्हा । जरी न ये तुझे कामा ॥
कर्ण असोनी बधीर । नाही कर्णी कथासार  ॥
तुकड्या  म्हणे आम्ही मेलो । जरी पंढरी ना गेलो ॥