तीर्थी पाहू नये मागे I

तीर्थी पाहू नये मागे । काय लागायाचे लागे   ॥
येती किती जाती किती । याची कायसी गणती ॥
संसारी या काय केले । सर्व आले आणि गेले   ॥
तुकड्या म्हणे अनाथासी । राहू न द्यावे उपवासी ॥