स्वप्न-सुखासम भास जगाचा, साक्षी होउनि पाही रे

(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला..)
स्वप्न-सुखासम भास जगाचा, साक्षी होउनि पाही रे !
रज्जूवरि सापाच्या भावा, धरिसी परि तो नाहीरे !| धृ०।।
व्य उपाधी लावूनि घेसी, बघता न दिसे काही रे!
निज-दृष्टीला सोडुनि बसला, तिच धरुनिया राही रे !।१॥।
देह नव्हे तू साक्षी त्याचा, सद्गुरू देती ग्वाही रे!
का बसला मी देह समजुनी? व्यर्थचि भुलसी बाह्यी रे !।२।|
नव्हसी देह मनादिक कोणी, अंत:करण तू नाही रे !
तू. तो शब्द परेच्या परता, सत्‌संगति बघ जाइ रे !।३॥|
तुकड्यादास म्हणे गुज समजुनि, अपुल्या स्वरुपा पाही रे !
विसरु नको कधि हीत हिताचे, निश्चय धरुनी राही रे ! ।४ ।।