कुणि सांगा हो ! या दीना
(चालः मज फिरफिरुनी छळिसि का...)
कुणि सांगा हो ! या दीना ।
प्रभु नयना येईल ना ? भेटेल का मम प्राणा ? ॥धृ0॥
चित्तास माझ्या चैन न राहे ।
नेत्र तयासी झुरु झुरु पाहे ।
दयावंत कोणी संत मौनी ! धरा ध्यानी
दुरावोनि नका द्याना ॥१॥
कीर्ति तयाची वेद - पुराणी I
भक्तास भेटी दे चक्रपाणी I
दास तुकडया गुण गाई लीन राही
सदा पायी बोधवाना ॥२॥