राम - नाम घ्या मनाशि राम

(चालः धन्य जाहला माझा...)
राम - नाम घ्या मनाशि राम - नाम घ्या ॥धृ0॥
साधुसंगि धरुनी रंग सोडुनि विषयाची भंग ।
वृत्ति   साधुनी    अभंग    अंग - संग    द्या ॥१॥
हाति काम मननि नाम जीवासी सदय प्रेम ।
विश्वचि हा नटत राम  भाव    चित्ति    घ्या ॥२॥
जे जे कुणि दिसत वस्तु प्रभु माझा हा समस्तु ।
तुकड्या म्हणे शिर - नमस्तु लीन बनुनिया ॥३॥