गडबडले चित्त माझे सुचेना जरा

(चाल: मम जीवा सुखवाया...)
गडबडले चित्त माझे सुचेना जरा ॥धृ0॥
काय करावे कोणा पुसावे ? जिव घाबरा ।
प्रभुराया  ! भेट देई सख्या    श्रीधरा ! ॥१॥
नावरे मनाची गति थोर वाहे शांति ना जरा I
रुप दावी मेघश्यामा  !   राधिकावरा ! ॥२॥
अखिल जगाचा तूची नियंता जाणसी पुरा ।
तुकड्याची हाक  घेई    दीन - उद्धरा ॥३॥