गुरुविण शांति न येइ कुणाला
(चाल: धन्य दिवस हा...)
गुरुविण शांति न येइ कुणाला ॥धृ0॥
पढले जरि श्रृति - वेद पुराणे वर्मचि न पडे ठाई । कुणाला ॥१॥
किति जरि केले योग याग ही तरि मन स्थीर न होई । कुणाला ॥२॥
तीर्थाटन कितिही जरि केले तरि भवि सौख्यही नाही । कुणाला ॥३॥
तुकड्यादास म्हणे सत् - संगे भ्रांति न तिळभर राहि । कुणाला ॥४॥