घेशिल ना करुणा घनश्यामा !
(चाल: काहेको बन बन...)
घेशिल ना करुणा घनश्यामा ! येउनि अंती कामा ॥धृ 0॥
अवघड ही यमधाड अम्हावर कोसळते बा रामा ॥१॥
नेतिल मज बांधुनिया गर्भी सुकृत - दुष्कृत नेमा ॥२॥
आठव मज येता प्रभु ! तुमचा चुकतिल गति यमधामा ॥३॥
तुकडयादास स्मरे तुज निशिदिनि वरचि असा दे आम्हा ॥४॥