का वरी झाकोनिया रडसी

का वरी झाकोनिया रडसी । बरि नाही स्थिती ।।धृ०।l
श्रीगुरुसी सोडूनी । धरिली क्षणीक ईच्छा मनी ।
त्वंपदा घे शोधूनी। मग होय मन  अद्वैतीमती ।।१।।
जन्म जन्माचे मळ । आता करि   रे   निर्मळ !
काढी थोर काजळ । राया तूचि  तू    श्रीपती ।।२।।
देव नलगे शोधणे । पहाया न जाणे कानने ।
स्थीर ठेवि  रे   मने ।     सत्चित्तानंदा    गती ।।३॥
का तुझ्या वाचोनिया । जगती असेरे कान्हया ।
दास तुकड्याचि घे मया । शोध हो  आरुढती ॥४॥
                         अनुभव सागर १९३४