साठवारे साठवारे । अनुदीनी त्याला आठवारे

साठवारे साठवारे । अनुदीनी त्याला आठवारे ।।धृ०।।
मायिका द्या काठवारे । श्रीहरी तो ताठवारे ।
विषय सुख ते नाठवारे । दुष्ट नरकी  पाठवारे ।।१।।
पाझराला गाठवारे । अमृतासी चाटवारे ।
पुण्य पापा   वाटवारे । सत्यरुपा      माठवारे ।।२।।
स्मरणी मन ते दाटवारे । गुरु चरणी तन् माठवारे ।
काम क्रोधा फाटवारे । द्वैत   द्याया   जाठवारे ।।३॥
तुकड्या तो भाटवारे । सांगतो गुण हाटवारे ।
सतगुणी मन  थाटवारे । दुर्गुणा   ते   जाटवारे ।।४ll
                   अनभव मागर १९३