तरिच पावशिल पदा, गुरुच्या, तरिच पावशिल पदा
(चाल; तू माझा यजमान...)
तरिच पावशिल पदा, गुरुच्या, तरिच पावशिल पदा०।|धू० ||
रोखुनिया विषयातुनि वृत्ती, शमदम धरिशिल सुधा ।। गु०1।1१॥।|
सद्गुरुवचना बेद समजुनी, हरशिल मन-आपदा ।। गु०।1२॥।
निश्चल भावे करिशिल सेवा, अहं विसरुनी सदा || गु० ०॥।३॥|
ब्रह्मलोकीचे राज्य मिळे जरि, तुच्छ मानि संपदा ।। गु०11४॥।
तुकड्यादास म्हणे तव होइल, कृपापात्र सर्वदा ।। गु०।।५॥।