अफाट पंढरीची पेठ I

अफाट पंढरीची पेठ । गमे दुसरा वैकुंठ ॥
लक्षावधि वारकरी । येती येथीच्या बाजारी ॥
नेती सामानाच्या गोण्या । चहू दिशासी वाटण्या ॥
तुकड्या म्हणे प्रेमभाव । हरिनामाची देवघेव ॥