संतमेळा महाद्वारी I

संतमेळा महाद्वारी । गजर भारी टाळांचा ॥                    झाली कीर्तनाची दाटी। रेटारेटी भक्तांची ॥
जैसी जाई फुला आली । मोकलली सर्वांगी ॥            तुकड्या म्हणे नाही पार I गर्जे अंबर विठ्ठली ॥