कोणी कैसे कोणी कैसे ।

कोणी कैसे कोणी कैसे । बाग जैसे माळ्याचे ॥
गुलाब  मोगरा फुलला । अवघा झाला सुगंध ॥
चढती विठ्ठलाच्या गळा । मिळून सगळा हार हा ॥
तुकड्या म्हणे देव नाचे । कौतुकाचे आनंदी ॥