संत उभारिली गुढी ।

संत उभारिली गुढी । चंद्रभागेचिया थडी ॥
कोणी जाय भेटावया । नये मागुता घरा या ॥
लाभे अमृताचे पान । तृप्त होय मन प्राण ॥
तुकड्या  म्हणे नारायण । आला भक्तांच्या कारण ॥