किती वेळ तुला दुख सांगावे ?

( चाल : दिल लुटनेवाले जादूगर . . . . ) 
किती वेळ तुला दुख सांगावे ? 
तुज कळतचि नाही काय हरी ? 
तुज वाचुनी कोण अम्हा दुसरे ? 
ही सर्व   पुराणे    गाई    हरी ! ॥धृ०॥ 
जाउनि घरडावे . व्यापासी , 
अणि तूहि तसा करशील जिवा । 
मग शेवटची ही हाय करी ! 
तुज कळतचि नाही काय हरी ? ll१।। 
जंव संताचा उपदेश मिळे , 
की प्रभू - भक्तचि हे सर्व कळे । 
जिव ओवाळुनिया तुजवरती , 
हे दृढ धरिले रे     पाय      हरी ! ll२ll
एक वेळ तरी दे दर्शन तू । 
ती बंसि धरोनी अधरासी । 
तुकड्या म्हणे , कर्ज फिटे अमुचे । 
दे झडकरी अपुली   राय   हरी ! ॥३॥ 
- कापसी , दि . ०९ - ०९ - १९६०