आजची भेट मला

( चालः जाये तो जाये कहाँ . . . ) 
आजची भेट मला , 
कंठ तुझ्याविण सुकला । 
जीव तुझ्याविण श्रमला हा ॥ धृ० ॥ 
क्षण - क्षण जातो वर्षासम हा , 
सकल जगता वाटे भ्रम हा । 
मधुर ध्वनि हा  अति    थकला ॥ १ ॥
निर्मल हे हृदयासन केले , 
निजभक्तीचे पुष्प उधळले । 
सुखसंकल्प      धूप    धरिला ।। २ ।। 
जिवन तुझ्याविण जळले - गळले , 
हृदय - धैर्य हे अति हळहळले । 
तुकड्यादास घे , म्हणे अपुला ।। ३ ।। 
- कलकत्ता दि . २६ - १२ - १९५४