दत्त दिगंबर स्मरता भावे, होशील भवि या पार रे!

दत्त दिगंबर स्मरता भावे, होशील भवि या पार रे! ।।ध्रु।।
अगम-निगम, श्रुती-उपनिषदादि, दाखवितिआधार रे! ।
अंतर-साक्षी होउनि पाहता, तरशीलहां संसार रे! ।।1।।
जागृति-स्वप्न-सुषुप्तिमाजि, विसरु नको निर्धार रे ।।
याविण नलगे साधन काही, व्यर्थ उगेसे भार रे!।1२॥।
निर्मल-प्रेमा जागृत ठेवी, होईल साक्षात्कार रे!।
दत्त दिगंबर ध्याता ध्यानी, भुलशी मग व्यवहार रे!1।३॥।
नलगे तीर्थाटन विचरावे, मनि धरि हा निर्धार रे!।
देइल दर्शन येउनि जागी, हा त्याचा अधिकार रे!।।४॥।
तुकड्यादास म्हणे गुज समजी, मनि लावुनिया तार रे!।
नि:संशय तू मुक्तचि झाला, चुकशी भव-अंधार रे! ।।५ ।।