कर्म नदीच्या धोपट मार्गी न्याय - तराजू सोडू नको
(चालः उठा गड्या ! अरुणोदय झाला...)
कर्म नदीच्या धोपट मार्गी न्याय - तराजू सोडू नको ।
अन्यायाचा मित्र गोड परि फोड उराशी जोडु नको ॥धृ0॥
सन्मित्रावाचुनी आपुले मर्म कुणाला सांगु नको ।
कष्टावाचुनि त्रास द्यावया भीक कुणाला मागु नको ॥१ ॥
दुर्जन शत्रू असेल त्याचे मर्म लपवुनी ठेवु नको ।
रणांगणी मरणेच बरे ? पण पापि जनाला भिऊ नको ॥२॥
विश्वासाला अपात्र जो नर कधी भरवसा ठेवू नको I
तुकडयादास म्हणे बळ असूनी निर्बल बाणा लेवु नको ॥३॥