विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने, विठ्ठल बोला हो !

(चाल- विठ्ठुल तो आला मज भेटण्या...)
विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने, विठ्ठल बोला हो ! ।
विठ्ठल बोला हो ! जय जय विठ्ठल बोला  हो ! ॥ध्रु।।
आला नरदेहासी प्राणी, नाही केली सुखाची करणी ।
अंती होईल तनूची हानी, चला झणी चला हो ।l विठ्ठल 0 ll१l।
जो करी साधू जनाचा संग, त्यासचि पावेल पांडूरंग ।
होवून संसारी  नि:स्संग,   रंगी   रंगू   द्या   हो  ॥ विठ्ठल0 ।|२||
कितीतरी आले आणि गेले, काहीच सार्थक नाही केले ।
खोवू नका आयु ही फुका, मार्ग नव्हे बरा  हो l। विठ्ठल0 ।|३|।
तुकड्यादास म्हणे त्या छंदी, जावूनी तोडी यमाची बंदी ।
चला उठा गड्यारे ! आधी कोण, आपुला  हो ।। विठ्ठल0 ।|४ll