जिव हा झाला केविलवाणा
(चाल: गौळणी सांगति गान्हाणी...)
जिव हा झाला केविलवाणा, तुझा रे गड्या ! विरह आवरेना ।
लागेना झोप जरा नयना, भेट सख्या ! राजिव मनमोहना ! ॥धृ०॥
तु गेला भारत सोडुनी, धिंगाणा रे घातला असुरांनी ।
कुठवरी सांगु ही गान्हाणी ? ॥१॥
कोणाचा धाक नसे कोणा, छळताति पापि हे अबलांना ।
खावयासी मिळेना गरिबांना, कापति रे ! गायी - बकऱ्यांना ॥२॥
आतातरी ऐक जरा कानी, धावोनिया येई रे चक्रपाणी ।
तुकड्याची आरोळी घे कानी ॥३॥