अमुचे प्रेम गुरुपदि राहो ।
(चाल: राग - जीवनपुरी..)
अमुचे प्रेम गुरुपदि राहो ।।धृ०।।
आणिक नलगे धनसुतदारा, विरह मनी गुरुचा हो ।।१॥।
मोक्ष नको अणि स्वर्ग नको तो, चित्त गुरु-गुण गावो।।२॥।
विस्मृत होउनि संसारासी, ध्यानी सद्गुरु घ्यावो ।।३॥।|
तुकड्यादास म्हणे सद्गुरुविण, तुच्छ दिसो ममता हो ।।४।।