कधि येशिल अवनीवरी ! सांग मोहना रे ?

(चालः ब्रजकि वाट चालो...)
कधि येशिल अवनीवरी ! सांग मोहना रे ? ।|धृ०।।
बघताती लोक तुला, वाट कशी तु चुकला ?
भुलला तर नाही मुला ?   नंद - नंदना   रे ! ।।१।।
भारत तुज प्रिय असे वदती तब भक्त कसे ?
सत्यचि हे काय असे ? - बोल ! बोलना रे !! l।२॥
सति-साध्वी रडति किती, सुजनांचे हाल अती l
गुंडाची भ्रष्ट मती,   चढलि   शिरी   बा   रे ! ।।३॥
पाहू नको अंत अता, होऊ नकोसी परका ।
तुकड्या म्हणे येई अता,  देई    दर्शना   रे ! ।।४।।