जेव्हा संकट करि आकांत , हाका मारु कुणाला नाथ !
( चालः धीरेसे आजा रे . . )
जेव्हा संकट करि आकांत , हाका मारु कुणाला नाथ ! llधृ०॥ घाबरतिल मग इंद्रिय सारे , अंधारी ये नयनाद्वारे ।
काही सुचेना जीव थरारे , देशील ना तू हात ! ll१ll
चालतिचे हे धन - जन सारे , शेवटि कोणि न घेतिल वारे । तुकड्यादास तुझ्या आधारे , सुख मिळु दे पदरात ॥२॥
- पंढरपुर , दि . ०५ - ०१ - १९५२