चला चला यमुनेतिरी I

चला चला यमुनेतिरी । खेळे गोपाळात हरि ॥
तेथे  उडे रजधुळी । लावू आपुल्या कपाळी ॥
ऐसे भाग्य नाही आता। व्यर्थ आमुची अहंता ॥
तुकड्या म्हणे स्वप्न दिसे । हरि दाखविल तैसे ॥